आजाराला कंटाळून जळगावात वृद्ध महिलेची आत्महत्या

जून 5, 2021 5:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ । आजाराला कंटाळून एका ६० वर्षीय वृद्ध महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी दुपारी जळगाव एमआयडीसी परिसरात उघडकीस आली आहे. सिंधूबाई वामन बुनकर (वय ६०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime

याबाबत असे की, शहरातील एमआयडीसी परिसरातील एम सेक्टर मध्ये राहणाऱ्या सिंधूबाई बुनकर यांनी सतत आजारी असल्याने आजाराला कंटाळून आज ५ रोजी दुपारी घरातील पंख्याला दोरीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आणले असता सीएमओ डॉ. सचिन अहिरे यांनी मृत घोषित केले.

याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. प्राथमिक तपास महेंद्र गायकवाड, शांताराम पाटील आदी करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now