वाघोड येथे २३ वर्षीय विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

जून 3, 2021 9:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जून २०२१ । २३ वर्षीय विवाहीतेने छताच्या पंख्याला रूपाल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रावेर तालुक्यातील वाघोड येथे आज गुरुवारी घडली. हर्षाली अतुल चौधरी (वय २३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून याप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वाघोड येथील हर्षाली चौधरी ही घरात एकटीच असतांना घरात असलेल्या छताच्या पंख्याला मोठा रूपाल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत नितिन नत्थू चौधरी यांनी दिलेल्या माहिती वरुन रावेर पोलिस स्थानकात अकास्मात मृत्युची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शना खाली फौजदार मनोहर जाधव हे कॅ सोनवणे तपास करीत आहे.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now