पारोळ्यातील कुख्यात गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई

जानेवारी 21, 2025 1:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी डोकं वर काढताना दिसत असून याच दरम्यान गंभीर गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे. अशातच पारोळा तालुक्यातील तामसवाडी गाव आणि परिसरात अनेक गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या कुख्यात गुन्हेगारावर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. हेमंत उर्फ नाट्या मच्छिंद्र पवार असे या गुन्हेगाराचे नाव असून याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी काढले आहे.

New Project 6

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

नाट्या पवार याचा स्थानिक शांततेवर विपरित परिणाम होत होता, यामुळे पोलीसांनी त्याचा स्थानबद्ध करण्याबाबतचा अहवाल तयार करून जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठविला. पोलीस अधिक्षक रेड्डी यांनी अहवालाचे अवलोकन करून हा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे मंजूरीसाठी रवाना केला. त्यानुसार मंजूरी मिळाल्याने नाट्या पवार याला कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क असून, गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोणतीही बेकायदेशीर हालचाल आढळल्यास तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now