ग्राहकांना दिलासा! तांदळाचे दर घटले, जळगावात आता ‘इतका’ आहे प्रति किलोचा भाव?

जानेवारी 19, 2025 2:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नवीन वर्षाची सुरुवात होताच ग्राहकांना वर्षभरासाठी धान्य खरेदीचे वेध लागतात. दरम्यान, गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा तांदळाच्या दरात ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जळगावच्या बाजारपेठेत दर कमी आहेत. काली मूंछ, वाडा कोलम, सुगंधी चिनोर अधिक पसंतीचे ठरत आहेत.

rice jpg webp

होलसेल असो की किराणा व्यापारी; त्यांच्याकडे नवीन तांदळाची आवक सुरू झाली आहे. जळगावच्या बाजारपेठेत तांदळाचे चांगली मागणी असलेले जवळपास सात प्रकार मिळतात. त्यापैकी काही उपलब्ध झाले आहेत, तर उर्वरित येत्या आठ ते १० दिवसांत आलेले असतील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. नवीन वर्षात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या वर्षातील शासनाचे निर्यात धोरण व अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान आदी कारणांमुळे दर प्रचंड वाढले होते. त्या तुलनेत यंदा ते बरेच कमी आहेत आणि पावसाळ्यापर्यंत वाढतील, अशी कोणतीही कारणे सध्यातरी दिसत नाहीत. जळगाव जिल्ह्यात विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, तुमसर, छत्तीसगड, पंजाब, हरयाणा आदी राज्यांतून तांदळाची आवक होते. खरेदी करणाऱ्यांमध्ये जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार भागातील ग्राहक असतात.

तांदळाचे भाव काय:
काली मूंछ : आता ५० ते ५२ रुपये , गेल्या वर्षी (२०२४) -६० ते ६२ रुपये
वाडा कोलम : आता ५५ ते ५८ रुपये, गेल्या वर्षी (२०२४) ६३ ते ६५ रुपये
बासमती : १०० ते १४० रुपये, गेल्या वर्षी (२०२४) १२० ते १६० रुपये
खिचडी (मसुरी) : ३४ ते ३६ रुपये, गेल्या वर्षी (२०२४)- ३७ ते ३८ रुपये

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now