जळगाव जिल्हा

Jalgaon : मराठी कामगारांवर अन्याय, मनसेनं आपल्या स्टाईलने परप्रांतीय मॅनेजरला शिवकला धडा, VIDEO व्हायरल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात परप्रांतीयांची मुजोरी वाढताना दिसत असून अशातच जळगावमधील एमआयडीसीतील एका कंपनीत मराठी कामगारांवर अन्याय केला जात असल्याच्या विषयावरून मनसे महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी परप्रांतीय व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

कंपनीतील परप्रांतीय व्यवस्थापक जाणून बुजून मराठी कामगार तरुणांसह नागरिकांचा तब्बल दोन महिन्यांपासूनचा पगार देत नसल्याचा प्रकार समोर आला. तसेच पार्सल पॅकिंगमध्ये मराठी मुलांवर चुकीचा तसेच चोरीचा आरोप करत असल्याची तक्रार कामगारांनी मनसेकडे पदाधिकाऱ्यांकडे केली होती. यानंतर आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट कंपनीत जाऊन परप्रांतीय व्यवस्थापकाला जाब विचारत त्याचा कानशिलात लगावली.

https://www.instagram.com/p/DE9fAoSz65O/

मनसे स्टाईलमध्ये केलेल्या आक्रमक आंदोलनानंतर काही तासातच परप्रांतीय व्यवस्थापकाने मराठी कामगारांचा पगार खात्यावर जमा केल्याची माहिती मिळाली आहे. या मराठी कामगारांना पगार तत्काळ मिळावा तसेच या ठिकाणी सुरू असलेले चुकीचा प्रकार लागलीच थांबवावा या शब्दात मनसेच्या पदाधिकार्‍यांनी परप्रांतीय व्यवस्थापकाला दम भरला आहे. मनसे महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी थेट कंपनीचे मॅनेजर यांच्या कानाखाली लगावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्याची एमआयडीसीमध्ये चर्चा रंगली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button