Jalgaon : जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे त्रुटीपुर्ततेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १०० दिवस उदिष्ठ कार्यक्रमानुसार विशेष मोहिम अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ वर्षात १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेले तसेच सेवा, निवडणुक प्रयोजनार्थ जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज दाखल केलेले मागासवर्गीय विदयार्थी तसेच उमेदवार यांच्याकरीता जात प्रमाणपत्र पडताळणीसमिती तर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी / उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर ज्या मागासवर्गीय विदयार्थी/उमेदवारांच्या अर्जांना ऑनलाईन त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत. अशा विदयार्थ्यांच्या, उमेदवारांच्या अर्जावर त्रुटी पुर्ततेकरीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव अंतर्गत दिनांक 22 जानेवारी ते 24 जानेवारी व 29 जानेवारी ते 31 जानेवारी या कलावधीमध्ये त्रुटी पुर्तता कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
विदयार्थ्यानी या कालावधीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदीर समोर महाबळ जळगांव येथे प्रत्यक्षात उपस्थित राहुन त्रुटी बाबत आवश्यक कागदपत्रे सादर करावी. जेणेकरुन विदयार्थ्यांचे अर्ज निकाली काढणे सोईचे होईल. त्यामुळे उमेदवारांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव एन.एस. रायते यांनी केले आहे.