रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
नर्सिंगचे द व्हाइटल व्हॉईस द्वितीय ; राज्यस्तरीय परिषदेनिमीत्त उपक्रम
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२५ । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे विविध सामाजिक विषयांवर आधारीत पथनाट्य स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाची रूद्राक्ष टीम विजेता ठरली. तर गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे द व्हाइटल व्हॉईस या टीमचे पथनाट्य उपविजेते ठरले.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दि. १७ ते १९ जानेवारी या कालावधीत आयएपीएसएम आणि आयपीएचएतर्फे २६ वी वार्षिक राज्यस्तरीय संयुक्त परिषद होणार आहे. या परिषदेच्या आयोजनाच्या निमीत्ताने बुधवारी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय परिसरात विविध सामाजिक विषयांवर पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चार संघांनी सहभाग घेतला. त्यात डॉक्टरांवर होणारे हल्ले या विषयावर एमबीबीएसच्या नटरंग टीमने पथनाट्य सादर केले. आयुर्वेद प्रकृती का योगदान यावर चरक या टीमने पथनाट्य सादर केले.
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या द व्हायटल व्हाईस या टीमने कौटुंबिक हिंसाचार यावर तर एमबीबीएसच्या रूद्राक्ष टीमने कुटुंब नियोजन या विषयावर पथनाट्य सादर करून विविध सामाजिक संदेश दिले. परीक्षक म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, बालरोग शल्यचिकीत्सक डॉ. मिलींद जोशी, डॉ. यादव यांनी काम पाहिले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी पथनाट्य सादर करणार्यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांमधील उत्साह आणि कल्पकता या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन चेतना आहेर व प्रथमेश गव्हाळे यांनी केले.
रूद्राक्षचे कुटुंब नियोजन विजेते
स्पर्धेत चारही टीमने सादर केलेले पथनाट्य हे दर्जेदार होते. परीक्षकांनी कुटुंब नियोजन ह्या रूद्राक्ष टीमला विजेता तर नर्सिंग महाविद्यालयाचे द व्हायटल व्हाईस उपविजेता म्हणून घोषित केले. विजेत्या स्पर्धकांना संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील व डॉ. सुहास बोरले यांच्या हस्ते रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत साळुंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डीन डॉ. आर.के. मिश्रा, डॉ.जयवंत नागूलकर, डॉ. हर्षल बोरोले, डॉ. नीलेश बेंडाळे, डॉ. माया आर्विकर, डॉ. दिलीप ढेकळे, प्रा. डॉ. बापूराव बीटे, प्रा. पियूष वाघ, प्रवीण कोल्हे, भवानी वर्मा, विजय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.