जळगाव लाईव्ह न्यूज । संघटित क्षेत्रात काम करणारे अनेक कर्मचारी असतात ज्यांचे पीएफ अकाउंट असते. हे पीएफ अकाउंट कर्मचारी भविष्य निधि संगठन (EPFO) द्वारा मॅनेज केले जातात. या अकाउंटमध्ये दर महिन्याला कर्मचारी आणि कंपनी दोन्हींकडून रक्कम जमा होते, ज्यामध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातील 12% रक्कम समाविष्ट असते. ही रक्कम एक गुंतवणूक म्हणून काम करते आणि सरकारद्वारा व्याज दिले जाते.
या अकाउंटमध्ये तुमचे आतापर्यंत किती पैसे जमा झाले हे तुम्ही घरबसल्या चेक करु शकतात.तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने तुमच्या पीएफ अकाउंटबाबत माहिती मिळवू शकतात.
तुम्ही EPFO पोर्टलवर जाऊन पीएफ बॅलेंसबाबत माहिती मिळवू शकतात.
सर्वप्रथम EPFO पोर्टला जावे.
त्यानंतर Our Services सेक्शनमध्ये जावे. त्यानंतर For Employees वर क्लिक करा.
यानंतर पासबुक या ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड टाका.
यानंतर तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंटमधील बॅलेंस चेक करु शकतात.
SMS द्वारे चेक करु शकतात पीएफ बॅलेंस
तुम्ही रजिस्टर नंबरवरुन 7738299899 नंबरवर मेसेज करायचा आहे.
तुम्ही EPFOHO UAN असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मेसेजवर पीएफ बॅलेंसची माहिती मिळेल.
मिस्ड कॉल देऊन करु शकणार बॅलेंस चेक
तुम्ही तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन 011-22901406 या नंबरवर मिस्ड कॉल द्या.
यानंतर काही मिनिटांतच तुम्हाला पीएफ बॅलेंसची माहिती मिळेल.
तुम्ही UMANG अॅपवरुन करु शकता बॅलेंस चेक
तुम्ही सर्वप्रथम UMANG अॅप डाउनलोड करा.
यानंतर ईपीएफओ ऑप्शन निवडा.
यानंतर Employee-Centric Services वर क्लिक करा.
तुम्हाला UAN नंबर टाकून ओटीपी टाकायचा आहे.
यानंतर तुम्ही पीएफबाबत सर्व माहिती मिळेल.