जळगाव जिल्हाबाजारभावबातम्या

दहा दिवसात तुरीचा दर तब्बल ‘एवढ्या’ रुपयांनी घसरला; शेतकरी चिंतेत, आताचे भाव पहा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२४ । एकीकडे कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव नाहीय. त्यात आता तुरीला तरी अपेक्षित भाव मिळेल या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. गेल्या दहा दिवसांत तुरीचा दर दोन ते अडीच हजार रुपयांनी घसरला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा पेच उभा राहिला आहे.

यंदा तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी झाले होते, मात्र आयात केलेल्या तुरीमुळे बाजारात आवक वाढली आहे. यामुळे तुरीचे भाव घसरत आहेत. जळगाव जिल्ह्यातही तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेल्या दहा दिवसांपूर्वी तुरीला ९५०० ते १०००० रुपये प्रतिक्विंटल एवढा चांगला दर मिळत होता. मात्र, आता हा दर २००० ते २५०० हजार रुपयांनी खाली आला आहे. ही बाब तूर उत्पादकांची चिंता वाढविणारी आहे. आगामी काळात दरात अशीच घसरण सुरू राहिल्यास शासनाने हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करून तूर शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, ही अपेक्षा

सध्या तुरीला जवळपास ७५०० ते ८००० रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत आहे. शासनाने तुरीसाठी ७५५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. तर बाजारात एक किलो तूर डाळीचा दर १७० ते १८० रुपये आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना थोडा फायदा होऊ शकतो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button