वर्षा अखेर सोने-चांदीने ग्राहकांना दिलासा; जळगावच्या सुवर्णपेठेत आज काय आहेत भाव?
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२४ । २०२४ या वर्षात सोन्याच्या (Gold Rate) दराने नवनवा उच्चांकी दर गाठला आहे. सोन्याने ८० हजारापेक्षा जास्तीचा टप्पा ओलांडला आहे. सोबतच चांदीने १ लाखापर्यंतचा टप्पा गाठला आहे. आता २०२५ मध्ये सोन्यासह चांदीचे (Silver Rate) दर कुठपर्यंत पोहोचणार? याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. मात्र याच दरम्यान वर्षा अखेर सोने-चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. Gold Silver Rate
देशभरात सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून यादरम्यान दोन्ही धातूंना मोठी मागणी असते. गेल्या काही काळात सोन्या चांदीच्या दरात कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीचे भाव वाढले होते, परंतु डिसेंबरच्या मध्यानंतर दोन्ही मौल्यवान धातुला चमकदार कामगिरी दाखवता आली नाही. या 15 दिवसात मोठी उभारी घेता आलेली नाही. किंमतीत चढउताराचे सत्र आहे.
सोन्याचा भाव
या महिन्यात 9 ते 15 डिसेंबर दरम्यान सोन्याचा तोरा दिसून आला. या काळात सोने उच्चांकावर असल्याचा दावा गुडरिटर्न्सने आलेखाद्वारे केला आहे. त्यानंतर जितकी किंमत वधारली. तितकाच भाव कमी झाला. या आठवड्यात 25 डिसेंबरला 100 रुपये, 26 तारखेला 280 रुपये, तर 27 डिसेंबर रोजी 270 रुपये असे एकूण 650 रुपयांनी सोने महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा भाव
गुडरिटर्न्सनुसार, 9 ते 15 डिसेंबर दरम्यान सोन्याप्रमाणेच चांदीने मोठी झेप घेतली. त्यानंतर मौल्यवान धातुत चढउताराचे सत्र दिसले. या आठवड्यात 23 डिसेंबर रोजी चांदी 100 रुपयांनी स्वस्त तर 25 डिसेंबर रोजी 100 रुपयांनी वधारली. 26 डिसेंबरला चांदी 1 हजारांनी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,500 रुपये इतका आहे.
जळगावातील भाव?
दरम्यान जळगावच्या सराफ बाजारात सध्या २२ कॅरेट १० सोन्याचा भाव विनाजीएसटी ७०,६७८ रुपये तर २४ कॅरेट १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ७७,१०० रुपये इतका आहे. दुसरीकडे चांदीचा दर ९०००० रुपये इतका आहे.