महाकुंभ मेळाव्यासाठी जळगाव, भुसावळ मार्गे धावणार नवीन गाडी, वेळापत्रक जाणून घ्या..
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२४ । यूपीतील प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी देशभरातून रेल्वे घावणार आहेत. यात रेल्वे क्रमांक ०६२०७/०८ म्हैसूर-दानापूर विशेष एक्सप्रेस भुसावळमार्गे धावणार आहे. जळगाव व भुसावळातील भाविकांना महाकुंभ मेळाव्यासाठी जाण्याची व्यवस्था या गाडीमुळे झाली आहे.
म्हैसूर-दानापूर ही गाडी १८ जानेवारी, १५ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२५ रोजी शनिवारी दुपारी साडेचार वाजता म्हैसूर स्थानकावरून निघेल. मंगळवारी सकाळी १० वाजता दानापूर स्थानकावर पोहोचेल. तर दानापूर येथून २२ जानेवारी, १९ फेब्रुवारी आणि ५ मार्च बुधवारी मध्यरात्री १.४५ वाजता निघेल.
तर म्हैसुरला शुक्रवारी दुपारी तीन वाजता पोहोचेल. या विशेष गाडीस १२ एसटी श्री टियर कोच, ६ द्वितीय श्रेणीचे स्लीपर कोच, २ सामान्य द्वितीय श्रेणीचे ड्बे आणि २ लगेज असे एकूण २२ डबे असणार आहेत.