⁠ 
बुधवार, मे 1, 2024

काॅक्रीटच्या रस्त्यांची कामे पुन्हा रखडली : मनपाने राेखले नाहरकत पत्र !

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२३ । शहरातील काॅक्रीटच्या रस्त्यांना नाहरकत देण्याचा निर्णय गेल्या आठवड्याच करण्य़ात आला. परंतु अजुनही पीडब्लूडीने रस्त्यांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे मनपाकडून देखिल भविष्यातील वाद टाळण्यासाठी नाहरकतचे पत्र राेखून धरण्यात आले आहे.

जळगाव शहरात १०० काेटींच्या काॅक्रीट रस्त्यांचे नियाेजन करण्यात आले आहे. या निधीतून काेणत्या भागातील किती रस्त्यांची कामे हाेणार याबाबत प्रचंड उत्सुकता अाणि संभ्रम निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात काॅक्रीटीकरणाच्या कामाला नाहरकत देण्याचा ठराव मंजुर झाला. परंतु नगरसेवकांकडून रस्त्यांच्या कामांवरून आराेप प्रत्याराेप करण्यात येत आहेत. वेगवेगळे मतेमतांतरे असल्याने भविष्यात रस्त्यांच्या कामावरून राजकारण हाेण्याची भिती मनपा अधिकाऱ्यांना अाहे.

त्यामुळे जाेपर्यंत पीडब्लूडीकडून अधिकृत यादी सादर केली जात नाही ताेपर्यंत नाहरकतचे पत्र द्यायचे नाही अशी भुमीका घेतल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळेच आठवडा उलटूनही अजुनही पत्र रवाना करण्यात आलेले नाही. दरम्यान शहर अभियंता चंद्रकांत साेनगिरे यांनी दाेन दिवसात नाहरकत पत्र दिले जाणार आहे. त्यासाठी पीडब्लूडीकडून काेणत्या रस्त्यांची कामे केली जाणार याची माहिती मागविण्यात आल्याचे सांगण्यात आले.