गुन्हेजळगाव जिल्हाबातम्या

धरणगाव तालुक्यात लक्झरी बस पलटली; एका महिलेचा मृत्यू, अनेक प्रवाशी जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२४ । धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ मंगळवार, 24 डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारासएक दुर्दैवी घटना घडली. गुजरात राज्यातील सुरत येथून अकोला येथे जाणारी लक्झरी बस महामार्गावर पलटी झाली. या दुर्घटनेत कविता सिद्धार्थ नरवाडे (वय 30, रा. भीम नगर, उधना, गुजरात) या महिला प्रवाशीचा जागीच मृत्यू झाला. अनेक प्रवासी जखमी झाले.

या घटनेबाबत माहिती अशी की, सुरत येथून एरंडोल मार्गे मलकापूर येथे जाण्यासाठी लक्झरी बस (क्रमांक जीजे ०१ डीवाय ५५०२) ही सोमवार, 23 डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता निघाली होती. बसवर साड्यांचे गाठोडे ठेवण्यात आलेले होते, जे मंगळवारी सकाळी एका साईडला झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस डिव्हायडर ओलांडून पलीकडे जाऊन पलटी झाली.

या अपघातात कविता सिद्धार्थ नरवाडे यांचा मृत्यू झाला असून सोपान नारायण सपकाळ (वय 54, रा. नरवेल ता. मलकापूर), विठ्ठल अमृत कोगदे (वय 75, रा. पळशी ता. बाळापूर जि. अकोला), विश्वनाथ नामदेव वाघमारे (वय 65, रा. वरणगाव), प्रशांत गजानन धांडे (वय 33, रा. नरवेल ता. मलकापूर) यांच्यासह इतर ८ ते १० प्रवासी जखमी झाले.

जखमींना स्थानिक नागरिकांनी मदत केली आणि खाजगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मयत झालेल्या कविता नरवाडे यांच्या मृतदेहाचा पंचनामा केला आणि जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला.

कविता नरवाडे ह्या त्यांचे पती सिद्धार्थ शामराव नरवाडे यांच्या वैद्यकीय उपचारासाठी नांदुरा येथील भावाकडे तीन मुलांना घेऊन प्रवास करत होत्या. पतीवर उपचारापूर्वीच त्यांच्यावर काळाचा घाला घातला असून, त्यांच्या पश्चात पती सिद्धार्थ नरवाडे, मुलगा राज आणि दोन मुली खुशी आणि तनु असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button