⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | बोदवड | युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटलांनी माहिती देताच तहसिलदार शेताच्या बांधावर

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटलांनी माहिती देताच तहसिलदार शेताच्या बांधावर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२१ । साळशिंगी शिवारातील लघु सिंचन तलावातील हेड रेग्यूलेटर व्हॉल्व दोन वर्षापासून नादुरुस्त स्थितीत होता. त्यामूळे शेतातील पाटचार्यांचा मार्ग बंद अवस्थेत होता. पाटबंधारे विभागाकडून या व्हॉल्वची दुरुस्ती सुरु आहे. परंतू, शेतकऱ्यांना कोणतीही पुर्वसुचना न देता गाळ साचलेल्या हेड रेग्यूलेटर व्हॉल्वच्या पडताळणीसाठी विभागाकडून पाणी सोडण्यात आले.

पाटचारींतून पाणी ओव्हर फ्लो झाल्याने ते पपई लागवड केलेल्या शेतात घुसल्याने शेतकर्याचा जीव मुठीत आला. सदरील माहिती शेतकरी गोकूळ पाटील याने युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांना देताच त्यांनी तहसिलदार प्रथमेश घोलप यांना सदरील प्रकार कळविला असता त्यांचेकडून तलावाला भेट देत थेट शेताच्या बांधावर जात पाहणी केली.

मान्सूनपुर्व तैयारीसाठी पाटबंधारे विभागाकडून साळशिंगी परिसरात असलेल्या लघु सिंचन तलावात दोन वर्षापासून नादुरुस्त असलेले हेड रेगुलेटर दुरुस्तीचे काम सुरु आहे. हेड रेगूलेटर जवळ मोठ्या प्रमाणात गाळ, मुरुम साचल्याने ते बंद अवस्थेत होते. विभागाकडून दुरुस्तीचे कामे सुरु आहेत. गाळ काढल्याने हेड रेगूलेटरसोबत लिकेजची पडताळणीसाठी शेतकर्यांना कोणतीही सुचना न देता पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्यात आले होते.

परंतू, गत दोन वर्षापासून बंद असलेल्या यंत्रणेमूळे पाटचार्या माती पडून बुजलेल्या अवस्थेत आहेत. पडताळणीसाठी पाटचार्यांत पाणी सोडल्या गेल्याने ते ओव्हरफ्लो होऊन थेट शेतात घुसल्याने पपईची लागवड केलेल्या शेतकर्याच्या जीव मुठीत आला.

साळशिंगी शिवारातील गट नंबर 376 मधिल शेतकरी गोकूळ लक्ष्मण पाटिल साडेपाच एकरवर 6500 झाडांची पपईची फळबाग लावली आहे. सदरील प्रकरण संबंधित शेतकऱ्यांनी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांना दिल्यावर त्यांनी तत्काळ तलावाची पाहणी करत तहसिलदार प्रथमेश घोलप यांना सदरील प्रकरणाची माहिती दिली. यावेळी प्रा. हितेश पाटील व तहसिलदार प्रथमेश घोलप यांनी तलावाजवळील हेड रेगूलेटर व्हॉल्वला भेट देत शेतातील पाटचारीची पाहणी केली.

पाटचारीचा मार्ग बंद झाल्याने शेतात पाणी घुसले आहे. यावेळी कालवा निरीक्षक बी.बी.महाजन यांना संपर्क करीत यापूढे पाणी सोडायच्या वेळी शेतकर्यांना पुर्वसुचना देणे गरजेचे आहे. बंद झालेला पाटचारीचा मार्ग मोकळ्या करण्याच्या सुचना तहसिलदार प्रथमेश घोलप यांनी कालवा निरीक्षक बी.बी. महाजन यांना दिल्या. सदरील लघु सिंचन तलावाचा हेड रेगूलेटर दोन ते तिन वर्षापासून बंद अवस्थेत आहे. सद्ध्या त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ पाण्याच्या प्रेशर मूळे पुढे गेला आहे. यावेळी लिकेजची पाहणी करुन पाटचारीचा बंद मार्ग मोकळा करण्यात येणार असल्याचे कालवा निरीक्षक बी.बी.महाजन यांनी सांगितले.

यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील, तहसिलदार प्रथमेश घोलप, तलाठी मेश्राम मँडम, शेतकरी गोकूळ पाटिल, दिपक माळी, राष्ट्रीय छावा संघटना तालूकाध्यक्ष गजानन पाटिल, युवासेना तालूका समन्वयक अमोल व्यवहारे ऊपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.