पिंप्री येथील जाहीर सभेत गुलाबराव पाटील यांना विश्वास
जळगाव लाईव्ह न्यूज । “मी प्रामाणिकपणे विकासकामे केली आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील रस्ते, बंधारे, व गिरणा नदीवरील पूलाचे प्रकल्प मार्गी लावले, पिंप्री सारख्या गावात प्रचंड प्रमाणावर निधी उपलब्ध करून रस्त्यांसोबत बंधाऱ्याच्या जाळे विणले. मतदारसंघ शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून प्रत्येक सामाम्य व गोर गरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मतदार संघात सदैव संपर्कात राहून राहिल्यामुळे सामान्य जनतेशी नाळ अधिक घट्ट केली आहे.
विकासासाठी कधीही मतदारांशी दुजाभाव केला नाही, आणि नेहमी मोठ्या भावाप्रमाणे मतदारांशी वागलो आहे,” वायफळ बडबड करणाऱ्या पेक्षा जनता काम करणाऱ्याला साथ देईल असा ठाम विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. मतदारसंघासह जिल्ह्याचा विकास करून खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे पालकत्व गुलाब भाऊंनी केले. आम्ही पिंप्री – सोनावद जिल्हा परिषद गटातून जास्तीत जास्त लीड देणार असल्याचे भाजपाचे जि. प. चे माजी सभापती पी.सी..आबा पाटील व जि.प. सदस्य गोपाल बापू चौधरी यांनी सांगितले. पिंप्री येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
विरोधकांचा घेतला समाचार
गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका करतांना म्हणाले की, जे आठ वर्षांत मतदारसंघात फिरकले नाहीत, आणि आता जाती- पातीचा खेळ करत आहेत. “त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे, त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक तरी आंदोलन केले का? त्यामुळे ते वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर टीका करत आहे. मात्र जनता हुशार आहे वायफळ बडबड करणाऱ्या पेक्षा काम करणाऱ्याला साथ देईल असा ठाम विश्वास आहे. सूत्रसंचालन व आभार प्रशांत पाटील सर यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
यावेळी रॉ.का.चे जिल्हाय्ध्यक्ष संजय पवार , भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, सेनेचे निलेश पाटील , रिपाईचे अनिल अडकमोल, पी.सी.आबा पाटील, गोपाल बापू चौधरी, मुकुंदराव नन्नवरे, डी.ओ.पाटील, प्रेमराज पाटील, अनिल पाटीलसुभाष अन्न पाटील, निर्दोष पवार नातेश्वर पवार,दिलीप भाऊसाहेब पाटील, दामू अण्णा, संजय पाटील सर, आबा धोबी, सरपंच कमलाबाई धोबी,नांना भालेराव, कैलास पाटील, गणेश चौधरी, , राजु पाटील, विजय पाटील, संदीप पाटील, अनिल झंवर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी , परिसरातील सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.