जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२४ । दिवाळीत सोने आणि चांदी दरात ऐतिहासिक वाढ झाल्याने ग्राहकांना मोठा फटका बसला. मात्र दिवाळीनंतर दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण झाली. गेल्या आठवड्यात सोने चांदी दरात झालेल्या घसरणीनंतर या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देखील दोन्ही धातूंमध्ये घसरण झालेली दिसून आलीय. यामुळे लग्नसराईसाठी सोने चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला. सराफ बाजारात खरेदीला जाण्यापूर्वी आजचे भाव काय आहेत ते आधी जाणून घ्या..
Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी (11 नोव्हेंबर 2024) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर 79,360 रुपयांवरुन 78,760 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. आज चांदीची किंमत 93,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. काल चांदीची किंमत 94,000 रुपये प्रति किलोग्राम इतकी होती