अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर सोने-चांदीचे भाव घसरले, जळगावमधील भाव पहा..

नोव्हेंबर 7, 2024 11:31 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२४ । अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवल्यानंतर, जागतिक बाजारपेठेत अनेक बदल दिसून आले आहेत. या निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला.

gold silver jpg webp

जळगावच्या सुवर्णपेठेत बुधवारी सोन्याच्या किमतीत २०० रुपयाची तर चांदी दरात १००० रुपयाची घसरण दिसून आलीय. सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही धातूंचे दर घसरले. जळगावात काल सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७९,२०० रुपये प्रति ग्रॅम होता.तर चांदीचा एक किलोचा भाव ९६००० रुपये इतका होता. आज गुरुवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा भाव २०० रुपयांनी घसरून विनाजीएसटी ७९,००० रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला. तर चांदीचा भाव एक हजाराने घसरून ९५००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

दरम्यान दिवाळीत सोन्याचा दर ८० हजारावर तर चांदीचा दर एक लाखावर पोहोचला होता. त्यात सोने दरात आतापर्यंत १२०० ते १४०० रुपयाची घसरण झाली तर चांदी दरात तब्बल ४००० रुपयापर्यंतची घसरण झाली. मात्र आता दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात होणार असून याकाळात दोन्ही धातूंचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now