⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | गुन्हे | धक्कादायक! जळगावात जुन्या भांडणावरून गोळीबार, कोयत्याने वार, दोघे तरुण जखमी

धक्कादायक! जळगावात जुन्या भांडणावरून गोळीबार, कोयत्याने वार, दोघे तरुण जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२४ । जळगाव शहरात गुन्हेगारी पुन्हा वाढताना दिसत यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच शिल्लक नसल्याचं दिसून येत आहे. अशातच शहरातील वाघ नगर स्टॉपजवळ दुचाकीवरुन आलेल्या ६ ते ८ जणांच्या गटाने सशस्त्र हल्ला केला. गोळीबारात एकाच्या मांडीला गोळी चाटून गेली. तर दुसऱ्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केल्याने तो जखमी झाला. दोघा जखमींना जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरा रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. हल्लेखोराचा शोध सुरू होता.

या घटनेबाबत असे की, शहरातील वाघ नगर स्टॉप परिसरात अक्षय सीताराम तायडे (वय-२६ रा.समता नगर) आणि (अक्षय सुरेश लोखंडे वय-२१ रा.समता नगर) हे दोन तरुण दुचाकी लावून उभे होते. दरम्यान, रात्री १० वाजेच्या सुमारास आठ ते दहा जणांचे टोळके त्याठिकाणी आले. त्यांनी दुचाकीजवळ उभ्या असलेल्या तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी टोळक्याने तरुणावर गोळीबार केला. यामध्ये अक्षय तायडे या तरुणाच्या मांडीला गोळी चाटून गेल्याने तरुण जखमी झाला.

टोळक्याने केलेल्या हल्ल्यात अक्षय लोखंडे या तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आला असून तो जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर टोळक्याने त्या तरुणांच्या दुचाकींची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांनी तेथील दगड उचलून दुचाकीवर टाकून त्यांचे नुकसान झाले. यामध्ये दुचाकी क्रमांक एमएच.१९.बीडी.८६२४ व एमएच.१९.ईडी.८८७९ क्रमांकाच्या दुचाकींचे नुकसान झाले आहे.

या घटनमुळे परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान, वाद पूर्ववैमनस्यातून झाला असून दुपारी एका उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. रामानंद नगर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर घटना घडून देखील पोलिसांना त्याचा थांगपत्ता देखील नाही. तब्बल तासभराने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जिल्हा रुग्णालयात पोहचले. या प्रकरणी रात्री उशिरा रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. हल्लेखोराचा शोध सुरू होता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.