सोन्याचा दर पुन्हा वाढला; जळगावात आता दहा ग्रॅमचा दर काय?
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२४ । या आठवड्याच्या सुरुवातीच्या चार दिवसात सोने दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा मिळाला होता. परंतु ऐन दसऱ्याच्या एक दिवसापूर्वी सोने दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांना झटका बसला. दसऱ्याला सोने १२०० रुपयाने तर चांदी २००० रुपयांनी वाढली, यानंतर सोने दरात पुन्हा वाढ झाली. तर दुसरीकडे चांदी दर स्थिर आहे.
शनिवारी सोने दरात प्रति तोळा ४०० रुपयाची वाढ झाली. आता दिवाळीपर्यंत सोन्याचा दर ८० हजारापर्यंत जाणार असल्याचा अंदाज पूर्ण वर्तविला जात आहे. आज रविवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर ७६४०० रुपये प्रति तोळा इतका झाला. चांदीचा एक किलोचा दर ९२००० रुपये इतका आहे.
गेल्या 15 दिवसांत सोने आणि चांदीत कमालीची वाढ आणि घसरण दिसून आली. पितृपक्षात दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. पितृपक्षात एरव्ही किंमती उतरतात. पण यावेळी हिजबुल्लाह-इराण आणि इस्त्रायल युद्ध भडकल्याने इकडे भाव वधारला. तर या आठवड्याच्या सुरुवातीपासून दरात घसरण दिसून आली. मात्र मागील दोन दिवसात सोने दरात पुन्हा १६०० रुपयांची वाढ दिसून आली. त्यामुळे साडेतीन मुहूर्तापैकी एका मुहूर्तावरील खरेदी खिसा कापणारी ठरली.