⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

ठरलं तर ! खासदार उन्मेष पाटीलांचा उद्या होणार ठाकरे गटात प्रवेश

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२४ । ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगाव जिल्ह्यातील राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे सध्याचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे उद्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या बुधवारी दुपारी बारा वाजता उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत पारोळा माजी नगराध्यक्ष करन पवार हे सुद्धा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, पक्षाने उमेदवारी नाकारल्याने उन्मेश पाटील हे नाराज असून लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरु होती. याच दरम्यान, उन्मेष पाटील यांनी आज मंगळवारी खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या भेटीनंतर उन्मेश पाटील थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे.