जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२४ । जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचे सिनिअर विद्यार्थिनींनी कामाच्या ठिकाणी रॅगिंग केल्याची तक्रार, थेट दिल्लीच्या अँटी रॅगिंग हेल्पलाईनवर केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत असे की, शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) स्त्रीरोग विभागातील पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षातील चार विद्यार्थींनी व दोन विद्यार्थ्याची रॅंगिंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यात द्वितीय वर्षातील तीन विद्यार्थींनींनी २५ सप्टेंबर रोजी सहा जणांची रॅगिंग केल्याचे राष्ट्रीय हेल्पलाईनला ई-मेलव्दारे कळविण्यात आहे.
या तक्रारीची दखल घेत जळगाव येथील शासकीय विद्यकिय महाविद्यालयातील अँटी रॅगिंग समितीला याबाबत तातडीने चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतर, काल पीडित मुलींची प्राथमिक चौकशी समितीकडून करण्यात आली असून आज ही चौकशी केली जात आहे.
या चौकशीमध्ये जो अहवाल समोर येईल, त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी सिनियर विद्यार्थिनी प्रथम वर्षाच्या मुलींचा मानसिक त्रास देऊन छळ करत असल्याची ही तक्रार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी म्हटल आहे. अद्याप या विषयात चौकशी सुरू असल्याने कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही