जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रीय महामार्गावरील भुसावळ नजीक जुना फेकरी टोलनाका ते दीपनगर केंद्रापर्यंत महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. दीड महिन्यानंतर सुद्धा दुहेरी मार्ग सुरु झालेला नाही. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी पहाटे एका कारला वाचवताना टैंकर व ट्रकची समोरासमोर धडक झाली. त्यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने प्राणहानी टळली. भुसावळ ते वरणगाव दरम्यान महामार्गावरील दीपनगर औष्णिक केंद्राचे प्रवेशद्वार ते फेकरी टोलनाक्यापर्यंतच्या भागात एकेरी वाहतूक सुरु आहे.
दक्षिणेकडील भाग वाहतुकीसाठी बंद केला आहे. यामुळे केवळ दुभाजकाच्या उत्तरेकडील मार्गिकवरून दोन्ही बाजूची वाहने ये-जा करतात. सोमवारी पहाटे नागपूर येथून गुजरातकडे जाणारी टक (सीजी.०४-एचएक्स. ७५८७ ) आणि वरणगावकडे जाणारा टैंकर (जीजे. ०६-एएक्स.९५१५) यांची समोरासमोर घडक झाली. दोन्ही वाहनांमध्ये चालक व क्लीनर असे चार जण होते. पण, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. पण दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा होऊन नुकसान झाले. घड़क जोरात असल्याने ट्रकची चाके बाहेर निखळून पडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही