⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | गुन्हे | Jalgaon : विद्युत तारा चोरणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीचा पर्दाफाश; चोरट्याकडून ४४ गुन्ह्यांची उकल

Jalgaon : विद्युत तारा चोरणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीचा पर्दाफाश; चोरट्याकडून ४४ गुन्ह्यांची उकल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२४ । जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेतातील इलेक्ट्रीक पोलवरुन विद्युत तारा चोरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीचा पर्दाफाश केला. या टोळीने वर्षभरापासून ४४ गुन्ह्यांची पथकाने उकल केली असून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवज व कार जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान चोरलेली तार रावेरच्या भंगार विक्रेत्याला विक्री केल्याप्रकरणी भंगार विक्रेत्याला देखील अटक करण्यात आली आहे.

याबाबत असे की, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, फैजपूर, यावल या भागातील शेतातील इलेक्ट्रीक पोलवरुन विद्युत तारा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकरी सत्र झाले होते. या गुन्ह्यांची उकल करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथक गेल्या दीड महिन्यांपासून संशयितांचा शोध घेत होते.

दरम्यान, विद्युत तार चोरी करणारी टोळी ही मध्यप्रदेशातील नूरा मोरे (वय ३५, रा. झिरपांझऱ्या, ता. धुलकोट, जि. बऱ्हाणपुर) व अनिल भेरसिंग मंडले यांच्या टोळीने केल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा चरुन तार चोरी करतांना नूरा केरसिंग मोरे याला रंगेहाथ पकडले. यावेळी त्याचे साथीदार मात्र तेथून पसार झाले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने रावेर, फैजपूर, यावल या भागाील ४४ ठिकाणी चोरी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली.

टोळीतील मुख्य संशयित नूरा मोरे याच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याला खाक्या दाखविताच त्याने या चोऱ्या त्याने खरेदी केलेल्या (एमपी ६८, झेडसी २५४६) क्रमांकाच्या कारने त्याचा शालक अनिल भेरसिंग मंडले, संजू चमार वास्कले (दोघ रा. परचुड्या, म. प्र) दिना मोरे, सावन उर्फ पंडू मोरे (दोघ रा. निलीखाडी, म. प्र) यांच्या साथीने केल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या देखील पथकाने मुसक्या आवळल्या. चोरलेली तार रावेर येथील भंगार विक्रेता यासीन हुसेन खान (वय ४२, रा. उटखेडा रोडा रावेर) याच्याकडे विक्री करीत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्याुसार भंगार विक्रेत्याला देखील अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा सखोल तपास करीत रावेर पोलीस ठाण्यातील २२, यावल पोलीस ठाण्यातील १४ तर निंभोरा आणि फैजपूर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी चार अशा एकूण ४४ गुन्ह्यांची उकल केली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.