बैलांची सजावट करताना शेतकऱ्यांसोबत घडलं दुर्दैवी ; गावात हळहळ
जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२४ । उद्या म्हणजेच २ सप्टेंबर रोजी पोळा सण साजरा होणार आहे. मात्र त्यापूर्वी जामनेर तालुक्यात दुर्देवी घटना समोर आलीय. पोळा सणासाठी बैलांना सजविण्याची तयारी करत असतांना एका शेतकऱ्याचा बैलाखाली दबल्याने दुदैवी मृत्यू आला. विठ्ठल देवचंद भडांगे (वय ६२ रा. पहूर कसबे ता. जामनेर) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
विठ्ठल भडांगे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. पोळा सणाच्या पुर्वसंध्येला बैलांच्या शिंगाना कलर लावत असतांना अचानक ते बैलाखाली दबले गेले, त्यात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला.
ही घटना शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. यावेळी नातेवाईकांनी एकच अक्रोश केला हेाता. त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत असून पोळा सणावर दुःखाचे सावट पसरले आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.