कोरोना

जळगाव जिल्ह्यात निर्बंध काही अंशी शिथिल : वाचा काय सुरू काय बंद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२१ । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढत असल्याचे जाहीर केले होते. राज्य प्रशासनाने ब्रेक द चेन अंतर्गत काढलेल्या आदेशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सोमवारी सायंकाळी विशेष आदेश जारी केले असून अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी ७ ते २ तरी तर इतर एकल दुकाने ९ ते २ या वेळेत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, व्यापारी संकुल आणि इतर मार्केट उघडण्याच्या सूचना नसल्याने अनेक व्यापारी अद्यापही आदेशाची वाट पाहत आहेत.

जळगांव जिल्ह्याकरीता लागू करण्यात आलेले संचारबंदीसह विशेष निर्बंध दिनांक 15 जून, 2021 रोजी सकाळी 07.00 वाजेपावेतो वाढविण्याबाबत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

काय सुरु काय बंद रहणार?

a) अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने दररोज सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 या वेळेत सुरु राहतील,

b) स्वतंत्र ठिकाणी असलेली (Standalone Single shops) इतर प्रकारचे सर्व दुकाने हे केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 09.00 ते दुपारी 02.00 या वेळेत सुरु राहतील. सदरची Non Essential दुकाने दर शनिवार व रविवार या दोनही दिवशी पूर्ण वेळ बंद राहतील सर्व Essential व Non Essential प्रकारच्या दुकानाच्या प्रवेशाच्या ठिकाणी /काऊंटर समोर एका वेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश राहणार नाही.

c) दुकान मालक / चालक यांनी दुकानांच्या दर्शनी भागात बैंक काउंटर प्रमाणे काच/ प्लास्टीकचे पारदर्शक शीट किंवा कमी खर्चात करावयाचे असल्यास पारदर्शक प्लास्टीक पडदा यांचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच सदर पडद्यातून केवळ ग्राहकास वस्तूंची देवाण-घेवाण करता येईल एवढीच मोकळी जागा ठेवण्यात यावी.

(d) अत्यावश्यक वस्तू व सेवांबाबत घरपोच वितरण सुविधा (Home deliveries) ह्या दररोज सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 या वेळेत देता येतील. ई कॉमर्स सुविधेद्वारे Non Essential वस्तूंची सुविधा सकाळी 09.00 ते दुपारी 02.00 या वेळेत देता येतील.

(e) सर्व प्रकारची केश कर्तनालये (सलून), स्पा सेंटर्स, जिम पूर्णपणे बंद राहतील. 1

f) अत्यावश्यक कारणांव्यतिरीक्त दुपारी 02.00 वाजेनंतर नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास बंदी राहील.

(g) सर्व शासकीय कार्यालयात (आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कार्यालये, पोलीस विभाग, अत्यावश्यक सेवा संबंधित कार्यालये वगळून) 25% कार्यालयीन उपस्थिती राहील. तथापि, कार्यालयीन उपस्थिती वाढविण्याबाबत कार्यालय प्रमुखांनी निर्णय घ्यावा.

h) जळगाव जिल्हा हा कृषीप्रधान असल्याने व मान्सूनपूर्व शेती विषयक कामे, पेरणी हंगाम सुरु असल्याने कृषी संबंधित सेवा पुरविणारी दुकाने हे दररोज सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 या वेळेत सुरु ठेवता येतील.

i) माल वाहतूक / कार्गो वाहतूक सुरळीतपणे सुरु राहील. तसेच सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 या वेळेनंतर देखील दुकानात केवळ माल भरण्याकरीता सुट राहील. तथापि सुट दिलेल्या वेळेनंतर दुकानातून ग्राहकास सेवा पुरविता येणार नाही. शासन आदेश दिनांक 12 मे 2021 अन्वये नियमांचे उल्लंघन करणारे दुकान मालक / चालक व घटक यांचेकडून रुपये 10,000/- मात्र दंड आकारण्यात येईल व पुन्हा चूक केल्याचे आढळून आल्यास कोबिड 19 चा संसर्ग कमी होईपावेतो सदचे दुकाने बंद ठेवण्यात येतील.

j) वरील नमूद आस्थापनांच्या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी / कामगार यांचे भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (वय वर्षे 45 वरील) लसीकरण करुन घेणे बंधनकारक राहील. तसेच सदर कर्मचारी / कामगार यांची साप्ताहिक RTICR चाचणी करुन घेणे बंधनकारक राहील.

(k) मॉर्निंग वॉक, सायकलोग, खुल्या मैदानातील व्यायाम याकरीता केवळ सकाळी 04.00 ते 08.00 यावेळेतच सुट राहील.


भविष्यात जळगाव जिल्ह्याचा पॉझिटीकीटी दर 10% किंवा अधिक झाल्यास व ऑक्सिजन बेडची उपलब्धता 40 % पेक्षा कमी झाल्यास सदरच्या आदेशात नव्याने सुधारणा करण्यात येईल.

जळगांव शहर महानगरपालिका व जळगांव जिल्हयातील सर्व नगरपालिका/नगर पंचायत भागातील गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर हातगाडीवर वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची (वेंडर्स/ हॉकर्स) व त्या ठिकाणी खरेदी साठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने शहरातील गर्दी होणाऱ्या अशा ठिकाणी रस्त्यांवर हातगाडीवर वस्तूंची विक्री करणान्या विक्रेत्यांना (वेंडर्स/ हॉकर्स) संबंधित वस्तूंची विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात यावी.
तथापि जे वेंडर्स/ हॉकर्स सदर निर्देशाचे उल्लंघन करतील त्यांचेवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात यावी.

वरील सुचनांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तरित्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.

सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button