जळगाव जिल्हा

कृषी सल्ला : विविध कीड आणि रोग नियंत्रण उपाययोजना, काय आहेत जाणून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२४ । भात पिकावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायसायक्लॅझोल ७५% पाण्यात मिसळणारी भुकटी @ १० ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी २. नाचणी पिकात करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड @ २.५ ग्रॅम किवा झायनेब @ ४ ग्रॅम प्रती १ लिटर पाण्यात मिसळून फवारणी ३. सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्याच्या नियंत्रणासाठी क्लोरॅन्ट्रानीलीप्रोल १८.५ % ३ मिली आणि खोडमाशीच्या नियंत्रणासाठी इंडोक्सीकार्ब १५.८ टक्के एस.सी. @ ७ मि.ली. क्लोरॅन्ट्रानीलीप्रोल १८.५ एससी @ ३ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी ४. मका पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी निमअर्क १५०० पीपीएम किंवा निबोळी अर्क ५% @ ५ मिली किंवा थायोमिथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५ झेडसी @२.५ मीली प्रती लीटर पाण्यात किंवा

क्लोरॅन्ट्रानीलीप्रोल १८.५ एससी, ३ मीली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी. ५. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी ५% निंबोळी अर्काची किंवा अॅसिटामेप्रिड २०% २ ग्रॅम प्रति १० लिटर किंवा पलोनिकॅमिड ५०% ६० ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून फवारणी तसेच कापूस पिकात आकस्मिक मर रोग आढळून आल्यास झाडाच्या मुळाशी, कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्लूपी) @२.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० डब्लूपी) २ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. ६)ज्वारी पिकावर खोड माशीच्या नियंत्रणासाठी २५% प्रवाही स्थिनालफॉस @१५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी ७) बाजरी व खरीप ज्वारी पिकावरील मिज माशीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३०% ई.सी. @१० मिली किंवा मॅलेथिऑन ५०% ई. सी. २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी ८) मूग व उडीद पिकात मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ५% निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट @१५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी तसेच मुग व उडीद पिकावरील भुरी रोग नियंत्रणासाठी गंधक (पाण्यात मिसळणारे) ८० डब्ल्यू.पी. @२५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात किंवा कार्बेन्डॅझिम ५० % डब्ल्यू. जी @ २५ ग्रॅम प्रती १० ग्रॅम लिटर पाण्यात मिसळून फवारणी ९) भुईमुग पिकावर टिक्का आणि तांबेरा या रोगांच्या नियंत्रणासाठी फ्ल्यूवेनडामाईड ३.५% + हेक्झाकोनॅझोल ५% उब्ल्यू. जी. @२५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी १०) तूर पिकावरील मर रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड @ २५ ग्रॅम + युरीया @ २०० ग्रॅम + पांढरा पोटॅश @ १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात घेऊन हे द्रावण झाडाच्या मूळाजवळ प्रति झाड १०० मिली पावसाची उघडीप पाहून द्यावे. असे आवाहन तांत्रिक माहिती व सहकार्य डॉ. पं. दे. कृ.वि., अकोला यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button