⁠ 
सोमवार, मे 20, 2024

लंडन ते मुंबई विमान प्रवासात प्रवासी बेशुद्ध; जळगावच्या डॉक्टर दाम्पत्याने वाचविले प्राण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२४ । येथील डॉ. गिरीश नारखेडे व डॉ. लीना नारखेडे या दाम्पत्याने लंडन ते मुंबई विमान प्रवासात एका ५५ वर्षीय मुंबईच्या प्रवाशाचा जीव वाचविला आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री १२:३० वाजता एका प्रवाशाची अचानक प्रकृती बिघडली होती. इमर्जन्सी लैंडिंग करणेही शक्य नव्हते. नारखेडे दाम्पत्य देवरूपी भेटल्याची भावना या प्रवाशाने व्यक्त केली.

त्वचारोगतज्ज्ञ असलेले डॉ. गिरीश नारखेडे व डॉ. लीना नारखेडे हे दाम्पत्य लंडनला फिरण्यासाठी गेले होते. बुधवारी ते परतीला निघाले. लंडन येथील हिथ्रो विमानतळहून मुंबईला येण्यासाठी निघाले असता भारतीय वेळेनुसार रात्री १२:३० वाजेच्या सुमारास अचानक एका प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागले, त्यात ते बेशुद्ध पडले. विमानातील कर्मचाऱ्यांनी कुणी डॉक्टर आहे का? अशी विचारणा केली. डॉ. गिरीश व डॉ. लीना नारखेडे यांनी तत्काळ प्रतिसाद देत जागेवरच त्याची तपासणी केली विमानातील ‘केबिन क्रु’कडील काही औषधे तसेच अन्य एका प्रवाशाकडील औषधी दिल्यावर तो प्रवासी थोड्या वेळात शुद्धीवर आला