डोळ्यातील भुरी, काचबिंदूवर एनडी याग मशिन आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार शक्य
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात सुविधा उपलब्ध
जळगाव लाईव्ह न्यूज । पडद्यामागील भुरी आणि काचबिंदू यावर आता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार सहज शक्य झाले आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध झाली असून नेत्र रूग्णांवर याद्वारे उपचार केले जाणार आहे.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाच्या हभप जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालय हे शेकडो नेत्रविकार रूग्णांसाठी मोठा आशेचा किरण ठरत आहे. आत्तापर्यंत हजारो रूग्णांवर या नेत्रालयाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया आणि उपचार करून त्यांना नवी दृष्टी देण्याचे कार्य केले आहे. आता डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या नेत्रालयात अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध झाली आहे. एनडी याग मशिन या आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून नेत्र रूग्णांवर उपचार केले जाणार आहे. आज माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी तपासणी करत या सेवेचा प्रारंभ केला.
काय आहे एनडी याग मशिन?
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते एनडी याग या आधुनिक मशिनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख डॉ. नि.तु. पाटील, डॉ. निखील चौधरी, डॉ. मयूरी निलावाड, डॉ. रेणूका पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर काही कालावधीत डोळ्याच्या पडद्याला भूरी येते. ही भूरी या एनडी याग मशिनद्वारे काढता येते. तसेच काचबिंदू असलेल्या रूग्णांवर देखिल या अत्याधुनिक मशिनच्या सहाय्याने उपचार करता येतात. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात भूरी किंवा काचबिंदू असलेल्या रूग्णासाठी हे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले असून रूग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन नेत्रालयातर्फे करण्यात आले आहे.