जळगाव जिल्हा

स्कूल बसच्या वाहन चालकांनी समजावून घेतले वाहतुकीचे नियम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावलचा उपक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२४ । डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावल वाहतूक शाखा नियंत्रण कक्ष भुसावळ यांच्या सौजन्याने ’स्कूल बसच्या’ वाहन चालकांसाठी वाहतुकीचे नियम यावर प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाला भुसावल शाखा फौजदार श्री.संजय बदाणे तसेच भुसावळ वाहतूक शाखा नियंत्रण विभाग शेख सलीम उपस्थित होते. या मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी केले. यात १०० च्या वर स्कुल बस,रिक्षा, व्हॅन चालकांनी सहभाग नोंदवला.

यावेळी मान्यवरांनी वाहतूकीचे नियम हे वाहनचालकांच्या व नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून बनवले असून सर्व नियमांची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थीताकडून वाहतुकीच्या दरम्यान येणा—या विविध समस्यांचे निराकरण देखिल करण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button