जळगाव-सुरत एसटी बसला अपघात; बस चालकासह तीन जण जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२४ । धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गवर चिंचपाडा रेल्वे फाटकाजवळ गुजरात राज्यातील एसटी बस व ट्राला यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झालाअसून यात बस चालकासह तीन जण जखमी झाले आहेत. अपघातात एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत असे की, जळगावकडे येणारी सुरत आगाराची बस (जीजे १८ झेड ७८९९) रविवारी रात्री महामार्गावरुन नवापूरच्या दिशेने जात असताना चिंचपाडा रेल्वे फाटकाजवळ समोरुन येणाऱ्या ट्राला (आरजे ०९ जीसी १५१३) सोबत अपघात झाला.समोरासमोर धडक झाल्याने बसचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. अपघात झाल्यानंतर बस महामार्गाच्या खाली चारीमध्ये जाऊन धडकली बस चालक कांतीलाल हलय्या रा. सुरत यांचे दोन्ही पाय दाबल्या गेल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातात बसमधील प्रवासी असलम मुसा बागवान रा. नवापूर यांच्यासह दोन प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
जखमी प्रवाशांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बस चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे