सर्वसामान्यांना आणखी एक मोठा झटका ; महागाईने १६ महिन्यांतील उच्चांक दर गाठला

जुलै 15, 2024 2:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२४ । महागाईतुन होरपळून निघणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे.नुकतीच वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जून महिन्यातील घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार घाऊक महागाईचा दर वाढून आता ३.३६ टक्के इतका झाला आहे. हा गेल्या १६ महिन्यांतील हा उच्चांक दर आहे.

Wholesale inflation jpg webp

जून महिन्यात महागड्या भाज्यांमुळे घाऊक महागाईचा दर वाढला असून खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतीमुळे घाऊक महागाईचा दर वाढल्याचं बोललं जातंय. उत्पादित अन्नपदार्थ, कच्चे पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायू तसेच खनिज तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम महागाईच्या दरावर झाला आहे.

विशेष बाब म्हणजे, यापूर्वी मे महिन्यांत घाऊक महागाईचा दर २.६१ टक्के इतका होता. मात्र, जून महिन्यात हाच दर ३.३६ टक्क्यांवर पोहचलाय. तसेच अन्नधान्याचा महागाई दरही जूनमध्ये ८.६८ टक्क्यावर गेला आहे. हाच दर मे महिन्यात ७.४० टक्के इतका होता. यामुळे आधीच महागाईचा मार सोसणाऱ्या जनतेला आणखीच त्रास सहन करावा लागणार आहे.

घाऊक महागाई दर कुठे वाढला अन् कमी झाला?
मे महिन्यात प्राथमिक वस्तूंच्या महागाईचा दर ७.२० टक्के इतका होता. जो आता जूनमध्ये ८.८० टक्के झाला आहे.
इंधन आणि उर्जा विभागाच्या घाऊक महागाई दरात किंचित घट झाली आहे. हा दर मे महिन्यात १.०३ इतका होता. जो आता जूनमध्ये १.३५ टक्के झाला आहे.
उत्पादन उत्पादनांच्या महागाई दरातही वाढला असून १.३४ टक्के इतका झाला आहे. मे महिन्यात हा आकडा ०.७८ टक्के इतका होता.
जून महिन्यात अंडी, मांस आणि मासे यासारख्या खाद्यपदार्थांमध्ये घट झाली असून ती शून्याच्या खाली गेली आहे. जूनमध्ये अंडी, मांस आणि मासे यांच्या महागाईचा दर -२.१९ टक्के आहे. मे महिन्यात हाच दर १.५८ टक्के होता.
जूनमध्ये डाळींच्या महागाईचा दरातही मोठी वाढ झाली असून तो २१.४ टक्यांनी वाढला आहे. ज्यामुळे डाळींचे भाव कडाडण्याची शक्यता आहे.
जून महिन्यात किरकोळ महागाई वाढ ५.१ टक्क्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now