गुन्हेजळगाव जिल्हा

फीसाठी पैसे कमवण्याच्या नादात जळगावच्या तरुणीने गमावले तब्बल 21 लाख रुपये

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२४ । ऑनलाईन फसवणुकीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. अशातच जळगावातील एका तरुणीने फीसाठी पैसे कमवण्याच्या नादात तब्बल २१ लाख रुपयांची गुंतवणूक केली; पण नफा तर सोडा मुद्दलही मिळाले नाही, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

चाळीसगाव येथील बीकॉमचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची फसवणूक झाली आहे. तिचे वडील शेतकरी असून घरची परिस्थिती बेताची आहे. तिचे मामा गुजरातमध्ये राहतात. त्यांनी शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला नफा मिळतो, मी करत आहे. तू पण महाविद्यालयाची फी व इतर खर्च काढण्यासाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. त्यावरून य तरुणीने वडिलांना सांगून मामा व काकांकडून पैसे उसनवार घेऊन १ लाखांपर्यंत गुंतवणूक केली. त्यात तिला २ हजार रुपयांचा नफा दाखवला गेला. नंतर गुंतवणूक वाढून ३ लाखांपर्यंत केल्यावर पैसे परत मिळाले नाही म्हणून वडिलांनी फसवणुकीची शंका उपस्थित केली.

तरी तरुणीने गुंतवणूक सुरू ठेवली; मात्र, नंतर फीसाठी पैसे कमवण्याच्या नादात आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यासोबत गुजरातमध्ये राहणाऱ्या मामाचीही ३५ लाखांत फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने सायबर पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध बीएनएस कलम ३१८(४), ३ (५) सह आयटी अधिनियम ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास एम. एम. कासार हे करीत आहेत.

अशी करतात भामटे फसवणूक
तरुणीला १७मे २०२४ रोजी मोबाइल क्रमांकावर साक्षी सिंग असे नाव सांगणाऱ्या महिलेने ९१८७३५०५९५७२ या मोबाइल क्रमांकावरून संपर्क करून ट्रेडिंग व शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देतो, असे सांगितले. त्यासाठी टेलिग्रामवरील खात्यावर https://app.ms-dndst ock.xyz/ ही लिंक पाठवली. तसेच MOTILAL OSWAL GROUP Q५ वा ग्रुपला जॉईन करून घेतले. दोन मोबाइल क्रमांकांवरून बैंक खात्याची माहिती पाठवण्यास सांगण्यात आले. १५ मे २०२४ ते ७ जुलै २०२४ दरम्यान आरटीजीएस ने २१,०७, ४५६ रुपये ऑनलाइन स्वीकारले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button