⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

अल्पवयीन मुलीला पळवून नेत केला अत्याचार ; तरुणाला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२३ । धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करणाऱ्या संशयित समाधान दंगल पाटील (वय-२५) या तरुणाला जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३० जुलै पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमकी घटना काय?
धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलगीला तिच्या गावातील समाधान पाटील याने ५ जुलै रोजी रात्री ११ वाजता पिडीत मुलीला फूस लावून दुचाकीने पळवून नेले. त्यांनतर ते चोपडा येथून लक्झरीने सुरत येथे गेले. तिथे नातेवाईकांकडे १० ते १२ दिवस राहिल्यानंतर समाधान पाटील याने मुलीला लक्झरीने शिर्डी येथे घेवून गेला. त्या ठिकाणी एका झोपडीत राहून तिच्यावर अत्याचार केला. २५ जुलै रेाजी दोघेजण शिर्डी बसस्थानकात असतांना शिर्डी पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले.

त्यानंतर दोघांना धरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, संशयित आरोपी समाधान पाटील याला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० जुलै पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.