भुसावळ रेल्वे विभागाच्या महसुलामध्ये जूनमध्ये लक्षणीय वाढ ; वाचा आकडा
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२४ । भुसावळ रेल्वे विभागाच्या महसुलामध्ये जून २०२४ मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या महिनाभरात रेल्वेने १२९ कोटींची कमाई केली आहे, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांनी दिली.
भुसावळ विभागाला प्रवासी वाहतुकीतून जून २०२४ मध्ये ७१.७० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. यात तिकीट तपासणीमध्ये ६५ हजार केसेस झाल्या. त्यात ५.८३ कोटी रुपयांच्या महसूल मिळाला आहे.
याशिवाय माल वाहतुकीद्वारे ४६.५७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. मालगाड्यांमधून मोटारगाड्या, पेट्रोलियम उत्पादने, कांदा, अन्नधान्य आणि सिमेंट वॅगनसह विविध प्रकारच्या मालाची वाहतूक केली आहे. पार्सल सेवेतून चार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. याव्यतिरिक्त विविध व्यावसायाच्या माध्यमातून दोन रुपयांचा महसूल मिळाला आहे. असा भुसावळ विभागाने जून २०२४ मध्ये १२९ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे.