⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | सावधान : रिक्षा चालकांनी मीटरप्रमाणे भाडे नाकारल्यास परवाना रद्द होणार

सावधान : रिक्षा चालकांनी मीटरप्रमाणे भाडे नाकारल्यास परवाना रद्द होणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । सर्व ऑटोरिक्षा चालकांना परवाना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक करतांना मीटरप्रमाणे भाडे घेणे बंधनकारक आहे, असे न केल्यास संबंधित रिक्षाचालकांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे देऊ असे म्हटल्यास रिक्षा चालकाने मीटरप्रमाणे भाडे घेणे अनिवार्य असुन ही बाब कायदेशिर आहे. परंतु उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे शहरातील अनेक प्रवाशांनी तक्रार केली आहे की, रिक्षा चालक मीटरप्रमाणे भाडे घेण्यास नकार देतात व ही बाब रिक्षा परवान्याचे उल्लंघन करणारी आहे.

सर्व ऑटोरिक्षा परवाना धारकांना आवाहन व सुचित करण्यात येते की, त्यांनी ऑटोरिक्षा फेअरमीटर कॅलिब्रेशन करुन घ्यावे तसेच प्रवाश्यांचा मागणी असल्यास फेअरमीटरचा वापर करुन प्रवाशी वाहतूक करावी अन्यथा अशाप्रकारचे पालन न करणाऱ्या परवाना धारकाविरुद्ध मोटार वाहन कायाद्यातील तरतुदीनुसार परवाना निलबंनाची दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

तसेच जळगाव शहरातील तमाम नागरिकांना कळविण्यात येते की, जळगाव शहरात ऑटो रिक्षाचालक आपणाकडून मीटरप्रमाणे भाडे आकारणी करीत नसतील तर आपण अशा ऑटो रिक्षा चालकाविरुद्ध उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव कार्यालयाच्या दुरध्वनी क्रं. 0257-2262619 किंवा [email protected]  या संकेतस्थळावर तक्रार करावी. त्यानुसार संबंधित परवाना धारकाविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असे श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.