गुन्हेजळगाव जिल्हा

विहिरीत उतरून हातपाय धुणे महागात पडले ; जामनेरच्या तरुणाने गमावला जीव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२४ । शेतात काम केल्यांनतर विहिरीत उतरून हात पाय धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत शिवारात घडली. धीरज नारायण पवार (वय १८, रा. टाकळी बुद्रुक ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

जामनेर तालुक्यातील टाकळी येथील धीरज पवार हा बुधवारी दि. ३ जुलै रोजी टाकळी बु. गावा लगत पिपळगांव गोलाइत शिवारात शेतात कामाला गेला होता.(केसीएन)शेतात खत देण्याचे काम आटपून नंतर दुपारी तीन वाजता घरी जाण्याची तयारी करीत असताना विहिरीत हात पाय धुण्यासाठी धीरज विहिरीत खाली उतरला.

मात्र विहिरीत त्याचा पाय घसरला व पाण्यात पडला. धीरज याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेऊन धीरजला जामनेर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले.(केसीएन) मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक दीपक रोठे करीत आहे. दरम्यान तरुण मुलाच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button