गुन्हेजळगाव जिल्हा

जळगावात अल्पवयीन मुलाने उचललं नको ते पाऊल; कुटुंबीयांचा आक्रोश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२४ । जळगाव शहरातील एक अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास लावून जीवनयात्रा संपवली. ध्रुव ललित बऱ्हाटे (वय १७, रा.सरस्वती नगर, भुसावळ रोड जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या आत्महत्यामागील कारण अस्पष्ट आहे. मात्र या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली.

याबाबत अधिक असे की, ध्रुव बऱ्हाटे हा तरूण आई, वडील, लहान भाऊ यांच्यासह रसस्वती नगरात वास्तव्याला होता. त्याचे वडील एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून तर आई भंगाळे गोल्ड येथे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. ध्रुव हा इयत्ता बारावी विज्ञान शाखेमध्ये मु.जे. महाविद्यालय येथे शिक्षण घेत होता. गुरुवार २७ जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ध्रुवचे आई-वडील हे कामाला निघून गेले. त्यानंतर सकाळी ध्रुव हा घरी एकटाच होता. त्याने घरामध्ये एका खोलीत स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केली. दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याचा लहान भाऊ शाळेतून घरी आला, त्यावेळेला भाऊ दरवाजा उघडत नाही म्हणून त्याने शेजारील नागरिकांना सांगितले. त्यावेळेला परिसरात राहणारे त्याचे नातेवाईक यांनी धाव घेतली. त्यांनी खिडकीतून पाहिले असता ध्रुव हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

त्यानंतर ध्रुव याला दरवाजा तोडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी सोसे यांनी तपासणीअंती मयत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी एकाच हंबरडा फोडत आक्रोश केला. शासकीय रुग्णालयामध्ये नातेवाईकांची गर्दी जमा झाली होती. शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button