⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

तुम्ही नोकऱ्या कशा करता मी बघतोच.. वाळू माफियांची पोलीस अधिकाऱ्यांना धमकी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । एका वाळू माफियाने चक्क पोलिसांनाच तुम्ही नोकऱ्या कशा करता मी बघतोच म्हणत धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याबाबत भडगाव पोलिसांत वाळू माफियाविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पेश कुमावत (वय ४४) यांनी पोलिसांत फायद दाखल केली. कुमावत हे येथील पोलिसात पोहेस्को म्हणून कार्यरत आहेत. कुमावत यांना दि.२९ रोजी रात्री २.२० वाजेच्या सुमारास शहरातील यशवंतगर कमानी जवळ आरोपी आमोल काबळे, रमेश काबळे यांच्यासह एक इसम रा.भडगाव हे ट्रॅक्टर मध्ये अवैध्यरित्या वाळू भरल्याचे आढळून आले. दरम्यान त्यांना थांबण्याचा इशारा दिला असता आरोपी आमोल काबळे यांनी त्याच्या ताब्यातील मोटर गाडी सरकारी वाहनास आडवी उभी केली. पोहेस्को अल्पेश कुमावत यांनी त्याला गाडी बाजूला घे सांगत असताना आरोपीने हुज्जत घातली व ढकलून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

दरम्यान, कार्यवाही करताना सदर आरोपी पोलिसांत येऊन तुम्ही नोकऱ्या कशा करता मी बघतोच, अशी धमकी दिली. याबाबत कुमावत यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी आमोल काबळे, रमेश काबळे यांच्यासह एक इसम रा.भडगाव यांच्याविरुद्व गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सचिन बाबळे करत आहेत.