गुन्हेजळगाव जिल्हा

कंटेनरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार जागीच ठार, मुक्ताईनगरातील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२४ । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. याच दरम्यान आता मुक्ताईनगर शहरातील बोदवड चौफुलीवरील उड्डाणपुलावर ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या कंटेनरला दुचाकीस्वार ओव्हरटेक करीत होता. यात दुचाकी घसरल्याने कंटेनरच्या चाकाखाली आली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला तरुण जखमी झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे.

मृताचे नाव अनिल छोटू डागोर (४०, रा. रामदेवबाबानगर, मलकापूर, जि. बुलढाणा) असे आहे. अनिल डागोर हे मित्र अभिषेक टाक यांना सोबत घेऊन मलकापूरकडून भसावळकडे जात होते. दरम्यान. बोदवड चौफुलीवर कंटेनरला ओव्हरटेक करीत असताना दुचाकी घसरली. क्लीनर भागाच्या मागच्या चाकाखाली दुचाकी आल्याने अनिल डागोर यांचा जागीच मृत्यू झाला, तर अभिषेक टाक थोडक्यात बचावले.

ते जखमी झाले आहेत. या घटनेने महामार्गावर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनास्थळी मुक्ताईनगर पोलिसांनी धाव घेतली. मृतदेह मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात आणला. मृत अनिल डागोर मलकापूर येथे रेल्वेस्थानकाच्या साफसफाईचा ठेका घेऊन आपला उदरनिर्वाह करत होते. याबाबत मुक्ताईनगर पोलिसांत अपघाताचा गन्हा दाखल करण्यात आला आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button