⁠ 
रविवार, मे 19, 2024

पोलिसांसोबत फिरला नंतर उलगडले तोच मित्राचा मारेकरी निघाला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२२ । गंगापूर येथील तरुणाचा २५ जूनला गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले होते. तेव्हापासून जामनेर पोलिस व एलसीबीचे पथक तपास करत होते. अखेर पोलिसांसोबतच वावरणारा वन मजूर या प्रकरणातील आरोपी निघाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. तशी कबुलीही वन मजूर नथ्थू काळू सुरळकर याने दिली असून त्यास एलसीबीच्या पथकाने अटक करून जामनेर पोलिसांच्या ताब्यात दिले.

शाम फकिरा टाकरे (वय ३०) हा तरूण २५ जून रोजी दारू पिवून गंगापुरी जंगलात आला. त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या नथ्थू काळू सुरळकर (रा. चिंचखेडा, ता. जामनेर) या वन मजुराशी त्याने हुज्जत घातली. शिवीगाळ करून झोपडी जवळच पडलेल्या फावड्याने वन मजुराला मारहाण ही केली. जंगलात येऊन शिवीगाळ व मारहाण केल्याचा राग आल्याने टाकरे माझ्याच खुर्चीवर झोपडीच्या खांबाला टेकून बसला असताना फावड्याच्या दांड्यानेच त्याचा गळा आवळल्याची कबुली वन मजूर नथ्थू सुरळकर याने एलसीबी पथकाला गुरुवारी दिली.

दरम्यान, सुरळकर यास एलसीबी पथकाने अटक करून जामनेर पोलिसांच्या स्वाधीन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले हे स्वतः जामनेर पोलिस ठाण्यात हजर होते. या तपासासाठी जामनेरचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे, एलसीबीचे सपोनि जालिंदर पळे, अंमलदार सुनील दामोदर, हेड कॉन्स्टेबल जयंत चौधरी, अरूण पाटील, संदीप सावळे, कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, रणजित जाधव, किशोर राठोड, विनोद पाटील, विजय चौधरी, भरत पाटील व जामनेर पोलिसांनी परिश्रम घेतले.

सोबत फिरणाराच निघाला आरोपी ….
गंगापुरी गावातील एक महिला राणतुळशीचे रोप घेण्यासाठी वन विभागाच्या नर्सरीवर आली. त्या महिलेने जंगलात गंगापुरी येथील टाकरे हा मृतावस्थेत उघडकीस आले पडल्याची माहिती नर्सरीतील कर्मचाऱ्यांना दिली. त्यावरून तत्काळ जामनेर पोलिसाना कळवून मृतदेह उचलण्यात आला. पंच म्हणून पोलिसांसोबत फिरणारा वन मजूर नथ्थू सुरळकर हाच अखेर त्याचा आरोपी निघाला.