⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | जळगाव जिल्हा | मोठी बातमी! एकनाथ खडसेंनी घेतली अमित शाह यांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?

मोठी बातमी! एकनाथ खडसेंनी घेतली अमित शाह यांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२४ । लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपात पुन्हा घरवापसी करणार असल्याची घोषणा केली होती; मात्र अद्यापही त्यांचा भाजप प्रवेश झाला नाहीय. अशातच आता एकनाथ खडसे यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांची सून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे देखील उपस्थित होत्या. दरम्यान, या भेटीदरम्यान अमित शाह आणि एकनाथ खडसे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

दोन महिन्यापूर्वी एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी आपण पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होते. मात्र खडसे यांचा अद्यापही भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळाला नाहीय. एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश आता राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार असल्याची चर्चा आहे. एकीकडे एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश अडलेला असताना, दुसरीकडे अमित शहांसोबतच्या भेटीला राजकीय वर्तुळात मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.

काल रात्री केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. नवी दिल्लीमध्ये अमित शहा आणि खडसे कुटुंबियांची भेट झाली. दरम्यान, एकनाथ खडसे भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार का अशा चर्चांना उधाण आले असून एकनाथ खडसे यांच्याशी माहिती घेतली असता ही भेट औपचारिक असल्याची माहिती त्यांनी नाथाभाऊंनी दिली आहे.

एकनाथ खडसेंना मिळणार मोठी जबाबदारी
दरम्यान, भाजपमध्ये घरवापसी होताच एकनाथ खडसेंच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. पक्षात प्रवेशानंतर खडसेंच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. एकनाथ खडसे आधी भाजपमध्ये होते, त्यांना पक्ष वाढीसाठी मोठं काम केलं आहे. त्यांना भाजप आणि संघाची रणनीती माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.