जळगाव जिल्हा

मार्गात बदल! जळगाव ते संभाजीनगरचा एसटी प्रवास महागला, आता मोजावे लागतेय इतके पैसे..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२४ । जामनेर तालुक्यातील वाकोद या गावातील वाघूर नदीवरील छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील क्र. ७५३ एफ डाव्या बाजूला असलेला जुना मोठा पुल जीर्ण व कमकुवत झाला आहे. त्यामुळे एसटीच्या मार्गात बदल केला असून, हलकी वाहतूक तोंडापूरमार्गे तर जड वाहतूक चाळीसगावमार्गे वळवली आहे. त्यामुळे जळगावहून तोंडापूर मार्गे १५ किलोमीटरचा फेरा आणि अडीच टप्पे वाढल्याने तिकिटात २० रुपयांची वाढ झाली आहे.

जळगाव ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गाची वाहतूक पोलिस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशानुसार रविवार दि. १६ जूनपासून दुरुस्ती होईपर्यंत बंद करण्यात आली आहे. यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहे

चाळीसगावपेक्षा तोंडापूरमार्गे स्वस्त
जळगाव एसटी विभागाच्या तोंडापूरमार्गे ९० टक्के बस जात आहे. या मागनि साध्या बसला २६० ऐवजी २८० रुपये तिकिटाचे पैसे मोजावे लागत आहेत. काही बसेस या चाळीसगावमार्गे जात असून, या मागनि सुमारे ३० किलोमीटर व चार टप्पे वाढल्याने तिकिटात ४० रुपयांची वाढ झालेली आहे.

पर्यायी मार्ग असे…
जड वाहतूक : नेरी एरंडोल- चाळीसगाव – छत्रपती संभाजीनगर
हलकी वाहतूक : फर्दापूर- तोंडापूर-मांडवा-वाकडी- शहापूर- जामनेर- नेरी

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button