गुन्हेजळगाव जिल्हा
Jalgaon : न्यायालयीन कोठडी सुनावताच आरोपीचे पोलिसांना गुंगारा देत कोर्ट परिसरातून पलायन
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२४ । भंगार विक्रेता मारहाणप्रकरणी अटकेतील भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय २३, रा. तांबापुरा) याला बुधवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयीन कोठडी सुनावताच तो पोलिसांना गुंगारा देत न्यायालयाच्या आवारातून पसार झाला. हे लक्षात येताच पोलिसांची भंबेरी उडाली आणि भोलासिंगच्या शोधार्थ पथक रवाना केले. सायंकाळी उशिरापर्यंत भोलासिंगचा शोध लागला नव्हता.
मंगळवारी भोलासिंगने एका भंगार विक्रेत्याला मारहाण करत तीन हजार रूपये हिसकावून पसार झाला होता. गुन्हा दाखल करुन त्याला शनिपेठ पोलिसांनी अटक केली. बुधवारी दुपारी त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. नंतर तो हातात बेड्या नसल्याची संधी साधून पोलिसांची नजर चुकवत न्यायालय आवारातून पसार झाला.