एकनाथ खडसेंचं दिल्लीला जाणं म्हणजे… ; मंत्री अनिल पाटीलांची बोचरी टीका

जून 10, 2024 4:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२४ । काल रविवारी नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडला असून यावेळी काही मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली गेली. यात रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेलेल्या रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली असून त्यांना सुद्धा मंत्रीपदाची शपत दिली गेली. दरम्यान, सुनबाई रक्षा खडसेला मंत्रिपद मिळताच माजी मंत्री एकनाथ खडसे कुटुंबासह दिल्लीला शपथविधी सोहळ्याला गेले होते. यावरून आता अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते मंत्री अनिल पाटील यांनी टीका केली आहे.

patil khadse2 jpg webp

एकनाथ खडसे यांचं दिल्लीला जाणं म्हणजे बेगाने शादी मे… असेच आहे अशी बाेचरी टीका मंत्री अनिल पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या दिल्ली दाै-यावर केली. दरम्यान, यावेळी मंत्री पाटील यांनी रक्षा खडसे यांना शुभेच्छा आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन केलं.

मंत्री अनिल पाटील म्हणाले एकनाथ खडसे हे कोणत्या पक्षात आहेत, त्यांना वरतून कोणी बोलवलेलं नाही. मात्र सासरा म्हणून त्यांना या शपथविधी सोहळ्यासाठी कोणी बोलवल असेल तर ते दिल्लीला गेले असतील. पाटील म्हणाले निवडणुक काऴात खडसेंनी लवकरच भाजपात येणार असल्याचे म्हटले. एकनाथ खडसे यांची कुठल्याही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत प्रवेशासंदर्भात चर्चा झालेली आहे असे मला वाटत नाही. मात्र खडसेंच्या या गोष्टीमुळे जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचे मताधिक्य कमी झाले.

जळगाव जिल्हा मंत्रीमय
रक्षा खडसे यातील तिसऱ्यांदा देणारे खासदार होऊन त्यांना मंत्रिपद मिळते याचा मोठा आनंद आहे. आता जळगाव जिल्हा मंत्र्यांनी भरलेला जिल्हा वाटतोय. भाजपचा मंत्री, शिवसेना शिंदे गटाचा मंत्री, राष्ट्रवादीचा मंत्री आणि आता केंद्राचे मंत्री. त्यामुळे आता सर्व मंत्र्यांना एकत्रित येऊन जिल्ह्याचा विकास करताना सोपं होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now