⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | तळईच्या आरोग्य अधिकाऱ्याला ९८ हजारांचा गंडा

तळईच्या आरोग्य अधिकाऱ्याला ९८ हजारांचा गंडा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२२ । ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे सातत्याने वाढत आहे. एका ठगाने चक्क आरोग्य अधिकाऱ्यालाच एनी डेस्क अप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून तब्बल ९८ हजार ९७६ रुपयाने गंडविले आहे. या प्रकरणी कासोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल तालुक्यातील तळई येथील सागर उत्तमराव पाटील (वय ३०, आरोग्य अधिकारी प्राथमिक केद्र तळई) यांनी पोलीसांत फिर्याद दाखल केली. पाटील यांच्या मोबाईलवर दि २८ रोजी एका अनोळखी व्यक्तीचा ९८७२७५१६४४ व अन्य एका नंबरहून फोन आला. त्या व्यक्तीने सागर पाटील यांना एनी डेस्क अप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगत पुढील कोड विचारून प्रथम ५० हजार रुपये नंतर ४८,९७६ असा एकूण ९८,९७६ रुपये खात्यातून परस्पर वर्ग करून घेतले. या प्रकरणी सागर पाटील यांनी दि ९ रोजी कासोदा पोलिसात अनोळखी नंबर धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नी. अशोक उत्तेकर हे करीत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह