७९ वर्षीय प्रा.कांबळे यांनी प्रा. कांबळेंनी ४० मिनिटात पार केली मॅरेथॉन
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । जयपूर येथील ग्रीन फीट स्पोर्ट्सतर्फे ‘विक्टरी राईड रण ट्वेंटी-ट्वेंटी टू व्हर्च्युअल मॅरेथॉन’ व जयपूर चॅम्पियन फिटनेसतर्फे ‘सोल्जर राईट ट्वेंटी-ट्वेंटी मॅरेथॉन स्पर्धा’ फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. या स्पर्धेत चाळीसगाव येथील ज्येष्ठ नागरिक प्रा. खुशाल कांबळे सहभागी झाले हाेते. त्यांनी दाेन्ही २ किलोमीटर अंतराच्या स्पर्धा ४० मिनिटे १६ सेकंदात पूर्ण करून यश संपादन केले. याबद्दल त्यांना अचिव्हमेंट प्रमाणपत्र देऊन गाैरवण्यात आले.
पाचाेरा येथील एम. एम. महाविद्यालयातील निवृत्त प्रा. खुशाल कांबळे हे उत्कृष्ट मॅरेथाॅन पटू असून वयाच्या ७९ वर्षी देखील ते विविध स्पर्धामध्ये सहभाग घेऊन सहज यश मिळवत आहेत. आतापर्यंत त्यांनी देशातील ९ मॅरेथाॅन स्पर्धेत सहभागी हाेऊन बक्षिस मिळवले आहे. या ९ स्पर्धेतील १० किलाेमीटर व १५ किलाेमीटरच्या अवघड स्पर्धा त्यांनी सहज पूर्ण केल्या आहेत. जयपूर येथे ८ व १३ फेब्रुवारी राेजी घेतलेल्या दाेन्ही २ किमीच्या ऑनलाइन स्पर्धा त्यांनी अवघ्या ४० मिनिटे १६ सेकंदात पूर्ण करुन बक्षिस मिळवले.
या कामगिरीबद्दल त्यांचा प्रा. रवींद्र निकम, मुख्याध्यापक उत्तमराव काळे, संजय चौधरी, राजकुमार सराफ, मुख्याध्यापक एस. एम. जाधव, दीपक देशमुख, दीपक पाटील, किशोर जाधव, जितेंद्र नेवे, पवन देशमुख, सुरेश मोरे, मयूर अमृतकर, केतन बुंदेलखंडी, सुरेश मदानी, चेतन पलन, विनायक मराठे, नीलेश चौधरी, नीलेश निकम, चेतन वर्मा, साहेबराव पाटील यांनी सत्कार केला.