रक्तदाता दिनानिमीत्त ७८ दात्यांचे रक्तदान ; डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालयाचा उपक्रम
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२४ । जागतिक रक्तदाता दिनानिमीत्त आयोजित रक्तदान शिबीरात डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह प्राध्यपकांनी रक्तदान केले. शिबीरात ७८ पिशव्यांचे रक्तसंकलन करण्यात आले.
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालयातर्फे आयोजित या रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिबीराच्या सुरूवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर यांनी जागतिक रक्तदाता दिनाचे महत्व विशद केले. त्यानंतर रक्तदान शिबीराला सुरूवात करण्यात आली. या शिबीरात प्राध्यापक, विद्यार्थी असे ७८ दात्यांनी रक्तदान केले.
यांची होती उपस्थिती
शिबीरप्रसंगी प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी, सहाय्यक प्रा. डॉ. अमित जैसवाल, डॉ. वैष्णवी अग्रवाल, प्रतिक लहामगे, डॉ. शिवानी चौधरी, डॉ. पंखुडी चौधरी यांच्यासह सहकारी उपस्थित होते. तसेच रक्तदान शिबीरासाठी डॉ. उल्हास पाटील रक्तपेढीचे समन्वयक लक्ष्मण पाटील यांनी परिश्रम घेतले.