जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२२ । राजपुत करणी सेनेचे राज्यउपाध्यक्ष प्रविणसिंग पाटील यांच्या ४३ व्या वाढदिवसा निमित्त ७५ रक्तदात्यांनी १२ रोजी आयोजित रक्तदान शिबिरात केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश (राजुमामा) भोळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे उपस्थित होते.
कोरोनाची तिसरी लाट आली असून राज्यात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे वाढदिवस रक्तदान शिबिराने साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजपूत करनी सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलसिंग मोरे, खान्देश कार्यध्यक्ष विलाससिंग पाटील, शिवसेनेचे भरत देशमुख, सत्यमेव जयतेचे संपादक दीपक सपकाळे, समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, दिलीप पाटील, बापुसिंग राणा, बी.एच. खंडाळकर, गणेश राणा यांची उपस्थिती होती. तर रक्तदान शिबिरासाठी रेड प्लस ब्लड बँकेचे व सहकारी रवींद्र पाटील, दीपक पाटील, सुरज पाटील, प्रमोद पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
हे देखील वाचा :
- आज धनत्रयोदशी! जाणून घ्या पूजाविधी आणि शुभ मुहुर्त..
- उत्तर महाराष्ट्रातून लोकमत खान्देश पॉलिटिकल आयकॉन पुरस्काराने अमोल शिंदे सन्मानित
- जळगावच्या ज्येष्ठ नागरिकांना आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची संधी, ६ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज
- दहाव्या अजिंठा वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती
- ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने 3 हजार वारकऱ्यांना पंढरपूर वारी