जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२२ । धरणगाव येथील विक्रम ग्रंथालयात श्री धन्वंतरी जयंती निमित्त धन्वंतरी आक्ज पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमात तरुण व्यावसायिक योगतज्ञ ज्ञानेशवरभाऊ चौधरी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तर रुग्णवाहिकेचे चालक नानभाऊ बागुल, प्रकाश मराठे व स्वच्छतादूत राजाभाऊ करोसिया हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. धन्वंतरी हे आरोग्याचे दैवत असून डॉक्टर इतकेच मोलाचे योगदान हे स्वच्छतादूत करत असतात , तसेच यौगिक जीवनशैली आत्मसात करून आपण चांगले आरोग्य प्राप्त करू शकतो याचमुळे योगतज्ञ यांचे मार्गदर्शन अतिशय महत्वपूर्ण असते ,
तसेच जर रुग्णास तात्काळ गरज पडल्यास ग्रामीण भागातून शहरातील तज्ञ डॉक्टरकडे वेळेवर पोचवण्यासाठी सदैव तत्पर असलेले रुग्णवाहिकेचे चालक हे सुद्धा आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत असे प्रतिपादन डॉ पुष्कर महाजन यांनी प्रास्ताविकात केले. या कार्यक्रमात रा स्व संघाचे तालुका संघचालक मोहन चौधरी यांनी दैनंदिन आरोग्य व संघ परिवाराचा त्या बाबतीत असणारा सेवाभावी दृष्टिकोन यांवर प्रकाश टाकला, शेवटी आभार प्रदर्शन डॉ पंकज अमृतकर यांनी मानले.