⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 9, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अवैध वाळू वाहतूक करणारे ७ ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडले, गुन्हा दाखल

अवैध वाळू वाहतूक करणारे ७ ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडले, गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२१ ।  अमळनेर तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक करणारे ७ ट्रॅक्टर ट्रॉली सह पकडण्यात आले असून चालक व मालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अवैध वाळू वाहतूकधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावेळी एकूण ५० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

याबाबत असे की, हिंगोने शिवारातील बोरी नदीच्या पात्रातून अवैध गौण खनिजाचे उत्खनन होत असल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना प्राप्त झाल्याने त्यांच्या आदेशानुसार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे,उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाने येथील नवनियुक्त पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नियोजनाखाली पो.हे.कॉ.दीपक वसावे,संजय पाटील, दीपक माळी, रवी पाटील,सुनील पाटील यांच्या पोलीस पथकाने अवैध रेती वाहतुकदारांवर कारवाई केली.

अशा प्रकारे केली कारवाई

१) 07,10,000/- रुपयेकिं. चे. एक स्वराज कंपनीचे ट्रक्टर क्रमांक एम. एच. 18/ ए. एन2313 व एक ब्रास रेती भरलेली त्याच्यावरील चालक शोएब खाँ मजीद खाँ वय 22 वर्षे रा. झामी चौक अमळनेर मालक जमाल शेख पुर्ण नाव माहीत नाही रा. कसाल्ली मोहल्ला अमळनेर

२) 07,00,000/-रुपये किं. चे. एक स्वराज कंपनीचे ट्रक्टर क्रमांक एम. एच.40 एल 1318 त्याच्यावरील चालक दिपक देविदास सोनवणे वय 25 रा. देवळी ता. अमळनेर मालक रोहीत कंखरे पुर्ण नाव माहीत नाही रा. पैलाड अमळनेर

३) 07,05,000/-रुपयेकिं. चे. एक स्वराज 744 कंपनीचे ट्रक्टर क्रमांक एम.एच.19 बी. जी. 8027 व आर्धा ब्रास रेती त्याच्यावरील चालक सोमनाथ मधुकर मोरे रा. रुपजी नगर अमळनेर मालक आबा भोई पुर्ण नाव माहीत नाही रा. भोई वाडा

४) 07,05,000/- रुपयेकिं. चे. एक स्वराज 735 कंपनीचे ट्रक्टर हिरव्या रंगाचे विना नंबरचे त्यात आर्धा ब्रास रेती असलेले त्याच्यावरील चालक श्रीराम लहु पवार वय 20 रा. मंगरुळ ता. अमळनेर मालक पप्पु रा. मंगरुळ ता. अमळनेर

५) 07,00,000/- रुपये किं.चे. एक स्वराज 735 कंपनीचे ट्रक्टरस लाल रंगाचे क्रमांक एम. एच. 18- झेड 1998 त्याच्यावरील चालक प्रविण सुधाकर सोनवणे वय 30 रा.निभोरा ता. अमळनेर मालक आकाश येवले पुर्ण नाव माहीत नाही रा. झामी चौक अमळनेर

६) 07,00,000/- रुपये किं.चे. एक स्वराज 735 कंपनीचे ट्रक्टर क्रमांक एम.एच-19 ए.एन-1318 त्याच्यावरील चालक अनिल राजु सोनवणे वय 22 रा. रुपजी नगर अमळनेर मालक रोहीत कंखरे पुर्ण नाव माहीत नाही रा. पैलाड

७) 07,00,000/- रुपये किं. चे. एक स्वराज कंपनीचे ट्रक्टर क्रमांक एम. एच-19 ए.पी-6810 त्याच्यावरील चालक व मालक मासुम खाँ उर्फ भु-या शब्बीरखाँ रा. अमळनेर

एकुण 50,10,000/- (पन्नास लाख दहा हजार रुपये किंमतीचे एवज त्यात 07 ट्रक्टर ट्राली सह व दोन ब्रास रेती वरिल नमुद वाहन चालक हे त्याचे मालकाचे सागणे वरुन त्याचे ताब्यातील वरिल नमुद वाहनात गौण खणिज चोरी करुन वाहनात भरत असतानां मिळुन आले असुन वरिल नमुद चालक व मालक यांच्या विरुद्ध पोना दिपक शांताराम माळी यानी फिर्याद दिले वरुन अमळनेर पोस्टेला भादवि कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास राहुल लबडे, पोलीस उप निरीक्षक अमळनेर पोस्टे हे करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.